Followers

Monday, December 25, 2017

 उर्मिला

   जाण्यास वेळी तुझ्या
   श्रृंगार सारा करूनी
   आसवे नयनात दडपून
   खिडकितच राहिली उभी

   सेवा करावी भ्राताची
   विचार सोडून माझा
   हाच हेतू आत ठेऊन
   मनातून उतरले तुझ्या

   हा कसला राज थाट
   हे कसले सुख-वैभव
   आभूषणाने वचनांच्या
   तुझ्या, नटून मी सदैव

   तुला दूर पाठवून, मी
   काळजावर दगड ठेवले
   तू तर लढला असुरांशी
   मी इथे स्वतःशीच लढले

   भोगतो जरी वनवास तू
   मलाच ही सजा आहे
   प्रेमाच्याच नावावर
   प्रेमाचाच त्याग आहे

2 comments: