आई जगदंबे । आलो तुझ्या दारी ।
सेवेस स्वीकारी । या भक्ताच्या ।।
नाम तुझे माते । वाचेवरी येता ।
लाभे प्रसन्नता । माझ्या मनी ।।
बुद्धिस दे माझ्या । प्रकाश ज्ञानाचा ।
तम अज्ञानाचा । संपवूनी ।।
अनिष्ट सवयी । न लागो स्वभावी ।
संगत लाभावी । विद्वानांची ।।
क्रोध मोह माया । हरुनी तू घ्यावी ।
शक्तिसह द्यावी । विनम्रता ।।
कुबुध्दीचा नाश । सज्जनांची सेवा ।
एवढाच द्यावा । आशीर्वाद ।।
मागणे अंतिम । मागतो गंधार ।
राहो तुझे कर । माझ्या शिरी ।।
© गंधार वि. कुलकर्णी
दि. २३ ऑक्टोबर २०२०
संपर्क : ९१५८४१६९९८
वा सुंदर अभंग गंधार! अगदी उस्फुर्त वाटतो.
ReplyDeleteवा !! छानच !!
ReplyDelete👌
ReplyDeleteVery nice Gandharkumar. Keep it up.👍👍
ReplyDeleteगंधार सुंदर अभंग.
ReplyDelete