Followers

Thursday, April 22, 2021

मी पुस्तक

हाती घेतल्या गेलो तेव्हा
खूप हर्षित झालो होतो
दुःखही खूप झाले कारण
न वाचता ठेवल्या गेलो होतो

एकच प्रश्न छळतो मला
माझा उपयोग कोणासाठी ?
धुळीतल्या कपाटासाठी
की मानवाच्या विकासासाठी

माझी भूमिका कशी बदलली
समजण्यास मी असमर्थ ठरलो
कधीकाळी ज्ञानभांडार होतो
पण आता रद्दी भंगार झालो

न कोणास केली चुगली
न कधी गाऱ्हाणे करतो
माझ्या या स्थितीवर उपाय
स्वत:लाच वाचून शोधतो

चंद्राचे नको जगणे मला
ज्यात कोणाचा स्पर्श नाही
मी तर बनेल पणतीचा दिवा
ज्ञानाचा उजेड देईल काही

अरे मानवा मला बघ जरा
किती रहस्यांनी भरलो आहे
तुम्ही तर सगळे संपून जाता
मी अजूनही उरलो आहे

© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क - ९१५८४१६९९८

4 comments:

  1. अप्रतिम काव्यरचना गंधारजी. अत्यंत कमी शब्दात पुस्तकाची आत्मकथा आपण मांडली आणि आम्हा सर्वांना पुस्तक वाचनाची प्रेरणा दिली त्याबद्दल अनेक आभार.
    आपणास जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
    आपला शुभचिंतक- प्रा. आशिष रमेशलाल कान्हू

    ReplyDelete
  2. आजच्या पुस्तक दिनानिमित्त पुस्तकाचे मनोगत अत्यंत समयोचित आणि सुंदर शब्दांत मांडले आहे

    ReplyDelete
  3. अर्थपूर्ण कविता

    ReplyDelete
  4. वाह! अतिशय सुंदर आणि समर्पक. खरोखरच हल्ली स्मार्ट फोन मुळे किंवा आपण सगळे कायम शर्यतीतल्या घोड्या प्रमाणे धावत असतो त्यामुळे पुस्तकं आपले किती जवळचे मित्र असू शकतात हे आपण विसरतो. सुंदर मांडणी..... अभिनंदन आणि शुभेच्छा

    ReplyDelete