सवय तुझीच झाली आहे
गेल्या काही दिवसांपासूनगरज तुझी वाटते आहे
गेल्या काही दिवसांपासून
गॅलरीत तू दिसावी म्हणून
अनेक चकरा रोज मारतो
व्यर्थ पेट्रोल जाळतो आहे
गेल्या काही दिवसांपासून
रोज कॉलेजला येतो आता
तुझा सीनियर झाल्यामुळे
थोडा शिस्तीत राहतो आहे
गेल्या काही दिवसांपासून
तू प्रश्न विचारशील म्हणून
आधी उत्तरे तयार ठेवतो
पुस्तके बरेच वाचतो आहे
गेल्या काही दिवसांपासून
कधी उगाच हसतो आहे
कधी एकटा बसतो आहे
विचित्र असा वागतो आहे
गेल्या काही दिवसांपासून
तुझा विचार असतो मनी
रोज रात्री झोपण्यापूर्वी
स्वप्नातही तुला बघतो आहे
गेल्या काही दिवसांपासून
कित्येक गुलाब तोडले मी
फक्त तुलाच देण्यासाठी
काट्यांना हाती धरतो आहे
गेल्या काही दिवसांपासून
तुझ्यावर प्रेम करता करता
स्वतःवर प्रेम करू लागलो
जीवन जगणे शिकतो आहे
गेल्या काही दिवसांपासून
© गंधार वि. कुलकर्णी
दि. २७ नोव्हेंबर २०२१
संपर्क : ९१५८४१६९९८
Good on gandharji
ReplyDeleteअप्रतिम डियर
ReplyDeleteछान लिहिली! 👍👍👌
ReplyDeleteExcellent
ReplyDeleteApratim khup jabardast
ReplyDelete👍👌👌
ReplyDelete👆👌👌👌👌👌 अप्रतिम लेखन गंधार
ReplyDeleteChan👌
ReplyDeletekyaa baat. kyaa baat....
ReplyDelete