Followers

Friday, May 2, 2025

वक्तादशसहस्त्रेषु

निघाला होता एक प्रवासी
ध्येय त्याचे साहित्य नगरी
पुस्तकांची शिदोरी सोबती
शंभर पानांची भूक जबरी

भाषेवर प्रभुत्व मिळवून
शब्दांनाही गुलाम केले
छंदाचीच सवय करून
दहा पानं रोज लिहिले

उत्स्फूर्तपणे जे-जे सुचले
तेच त्यांचे काव्य झाले
कवितेच्या संसारात त्यांच्या
असोशी,रेघा,अंगारा जन्मले

जरी यशाचे स्वामी झाले
सोडीले नाही जन्मक्षेत्र
श्रोत्यांनीच करून पारख
ठरवले त्यांना सरस्वतीपुत्र

जरी दुःखाची झळ लागली
तरी सदानंदी जीवन जगले
दुःखालाही विषय मानून
दुःखावरही व्याख्यान दिले

सहवास तुमचा आज नाही
ही एकच माझी खंत ठरली
वक्तादशसहस्त्रेषुस दिलेली
कविताच माझी श्रद्धांजली

© गंधार विश्राम कुलकर्णी
संपर्क - ९१५८४१६९९८

5 comments:

  1. वा, छान कविता

    ReplyDelete
  2. वासमर्पक वर्णन

    ReplyDelete
  3. हृदयातील संवेदना काव्यातून अतिशय सुंदर रेखाटल्या.

    ReplyDelete
  4. सुंदर शब्द रचना

    ReplyDelete