Followers

Tuesday, June 9, 2026

जाणीव

यशस्वी तो पुत्र जणू, वृक्ष एक बहारदार,
फळ-फुलांच्या रूपाने हा, यशाचाच अविष्कार.

​आई म्हणजे ती माती, जिने दिली मायेची ऊब,
तिच्याच त्यागामुळे लाभले, कोंबाला वृक्षाचे रूप.

वडील म्हणजे वृक्षाचे मूळ, जे कधी ना कुणा दिसे,
खोल रुतून भूमीत, हा भार त्यांनीच पेलला असे.

​कष्ट आई-वडीलांचे, कधी ना कुणा दिसतात,
जगाला दिसले नाही तरी, वृक्षाला नित्य जाणवतात.

© गंधार कुलकर्णी
दि. ०९ जुन २०२६