यशस्वी तो पुत्र जणू, वृक्ष एक बहारदार,
फळ-फुलांच्या रूपाने हा, यशाचाच अविष्कार.
आई म्हणजे ती माती, जिने दिली मायेची ऊब,
तिच्याच त्यागामुळे लाभले, कोंबाला वृक्षाचे रूप.
वडील म्हणजे वृक्षाचे मूळ, जे कधी ना कुणा दिसे,
खोल रुतून भूमीत, हा भार त्यांनीच पेलला असे.
कष्ट आई-वडीलांचे, कधी ना कुणा दिसतात,
जगाला दिसले नाही तरी, वृक्षाला नित्य जाणवतात.
© गंधार कुलकर्णी
दि. ०९ जुन २०२६
No comments:
Post a Comment