जाचक अशा बंधनांशी
जुनाट साऱ्या रिवाजांशी
विभागलेल्या समाजाशी
नव्या बुद्धिने लढून घेऊ
हळव्या मनास बोललो मी
आता थोडं झगडून घेऊ
दृढ निश्चय करूया आता
प्रत्येक बाजी जिंकण्याचा
दुनियादारी बाजूस सारून
मनाप्रमाणे वागून घेऊ
हळव्या मनास बोललो मी
आता थोडं झगडून घेऊ
धैर्य बाळगून गरूडाचे
पिंजरे तोडूया मर्यादांचे
आलेत कितीही वादळे तरी
ढगांच्या वरती उडून घेऊ
हळव्या मनास बोललो मी
आता थोडं झगडून घेऊ
चिंता, पर्वा सोडून साऱ्या
डोळ्यात मोठे स्वप्ने पाळू
निडर होऊन एकदा तरी
जीवनाला पूर्ण जगून घेऊ
हळव्या मनास बोललो मी
आता थोडं झगडून घेऊ
© गंधार कुलकर्णी
दि. २२ मार्च २०२१
This comment has been removed by the author.
ReplyDeleteखूपच सुंदर....प्रेरक ����
ReplyDeleteछान.👌👌👌
ReplyDeleteपरंतु तुझा स्वभाव पाहता,तु तुझ्या मनास कितीहि विनवणी केली तरी झगडा करण्यास तयार होणार नाही😜😜😜
Nice one
ReplyDeleteNice one
ReplyDelete