Followers

Thursday, March 25, 2021

आता थोडं झगडून घेऊ

जाचक अशा बंधनांशी
जुनाट साऱ्या रिवाजांशी
विभागलेल्या समाजाशी
नव्या बुद्धिने लढून घेऊ
हळव्या मनास बोललो मी
आता थोडं झगडून घेऊ

दृढ निश्चय करूया आता
प्रत्येक बाजी जिंकण्याचा
दुनियादारी बाजूस सारून
मनाप्रमाणे वागून घेऊ
हळव्या मनास बोललो मी
आता थोडं झगडून घेऊ

धैर्य बाळगून गरूडाचे
पिंजरे तोडूया मर्यादांचे
आलेत कितीही वादळे तरी
ढगांच्या वरती उडून घेऊ
हळव्या मनास बोललो मी
आता थोडं झगडून घेऊ

चिंता, पर्वा सोडून साऱ्या
डोळ्यात मोठे स्वप्ने पाळू
निडर होऊन एकदा तरी
जीवनाला पूर्ण जगून घेऊ
हळव्या मनास बोललो मी
आता थोडं झगडून घेऊ

© गंधार कुलकर्णी
दि. २२ मार्च २०२१



5 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Dhanashree DharkarMarch 26, 2021 at 2:34 AM

    खूपच सुंदर....प्रेरक ����

    ReplyDelete
  3. छान.👌👌👌
    परंतु तुझा स्वभाव पाहता,तु तुझ्या मनास कितीहि विनवणी केली तरी झगडा करण्यास तयार होणार नाही😜😜😜

    ReplyDelete